शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीची झडप! बिबीसह लोणार परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; लग्न मंडपातही खळबळ....

 
लोणार (सचिन गोलेच्छा:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):लोणार तालुक्यातील बिबी गावासह परिसरात आज दुपारी ३ वाजता अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही क्षणांत गारपिटीने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

  allowfullscreen

सुमारे ४५ ते ५० मिनिटांच्या या पावसात गारा आणि वाऱ्यामुळे कांदा, ज्वारी, भाजीपाला, फळपीक व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याचवेळी आज लग्नसत्र असल्याने अनेक ठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. पावसाचा जोर एवढा होता की, जेवणाच्या वेळेसच वऱ्हाडांमध्ये एकच गोंधळ आणि धावपळ उडाली. काही ठिकाणी मंडप उडाले, तर काही ठिकाणी अन्नसामुग्री भिजली.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.