नगर पालिका निवडणूक;
अध्यक्षपदाचे ५६ तर सदस्य पदासाठीचे तब्बल ७०७ अर्ज झाले छाननीत बाद; आता रिंगणात अध्यक्षपदासाठी १५७ तर सदस्यांसाठी १,८५० उमेदवार रिंगणात...
Nov 20, 2025, 16:44 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, थंडीच्या सकाळीतही राजकीय तापमान उच्चांकावर आहे. उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण होताच जिल्हाभरातून एकूण ७६३ अर्ज अवैध ठरले आहेत. यात नगराध्यक्षपदाचे ५६ आणि नगरसेवकपदाचे तब्बल ७०७ अर्जांचा समावेश आहे.
आता नगराध्यक्षपदासाठी १५७ व नगरसेवकपदासाठी १,८५० अर्ज पात्र ठरल्याने एकूण २००७ उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. अंतिम माघारीपूर्वी कोण, कुठे रणांगण सोडतो, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील नगरपालिकांनुसार पात्र अर्जांची स्थिती
नगर पालिका अध्यक्ष सदस्य
बुलढाणा १२ १८२
चिखली २२ १८४
देऊळगाव राजा १५ १५९
जळगाव जामोद ९ ११५
खामगाव १२ १८९
लोणार १९ १६०
मेहकर १४ १७६
नांदुरा १२ १७४
शेगाव १९ १६१
सिंदखेड राजा ११ ९८
मलकापूर १४. २५२
कोठे किती अर्ज बाद?
बुलढाणा : नगराध्यक्ष १, नगरसेवक ६६
चिखली : नगराध्यक्ष १, नगरसेवक ८६
देऊळगाव राजा : नगराध्यक्ष ८, नगरसेवक १९
जळगाव जामोद : नगराध्यक्ष ५, नगरसेवक ५२
खामगाव : नगराध्यक्ष २, नगरसेवक १६
मेहकर : नगराध्यक्ष ६, नगरसेवक १५०
नांदुरा : नगराध्यक्ष ३, नगरसेवक ३९
शेगाव : नगराध्यक्ष १७, नगरसेवक १०६
सिंदखेड राजा : नगराध्यक्ष १, नगरसेवक ८
मलकापूर: नगराध्यक्ष १, नगर सेवक ८
१८ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या छाननीनंतर आता सर्वांचे लक्ष अर्ज माघारीच्या दिवशी कोणत्या जागांवर किती उमेदवार माघार घेतात, याकडे लागले आहे. अनेक ठिकाणी तिढे आणि बहुकोनी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.