शेलसूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार! गटशिक्षणाधिकारी पाटील म्हणाले,स्व. माधवराव देशमुख यांचे कार्य युवा पिढीसाठी दिशादर्शक...
येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्व. माधवराव देशमुख पुण्यतिथी निमित्ताने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कौतिकराव हेलगे होते. उपाध्यक्ष शोभाताई देशमुख, केंद्रप्रमुख अनाळकर, अपर्णाताई देशमुख, संग्राम देशमुख, साक्षी देशमुख, प्रा. अनिल हेलगे, पोलीस पाटील राजेंद्र रिंढे, शेषराव घेवंदे,पञकार श्याम देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना पाटील म्हणाले की, विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून शिक्षण देणे हे प्रशासनाचे ध्येय असून ते साध्य करण्यासाठी विविध शिक्षणपूरक उपक्रमांची जोड त्याला द्यावी लागते. असे उपक्रम या विद्यालयात अनेक वर्षांपासून राबवले जात असल्याने या विद्यालयातील विद्यार्थी स्पर्धेत कोठेही मागे राहात नसून विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व गूणवंत विद्यार्थांचे कौतुक केले. याप्रसंगी श्री अनाळकर व संग्राम देशमुख यांचीसुद्धा समायोचीत भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्हि. आर. घ्याळ यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डी. एम. कापसे यांनी तर आभार सौ. लहाने यांनी मानले.