'लोकसभा' साठी माध्यम प्रमाणीकरण समिती गठीत; पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे, संजय जाधव यांचा समावेश
Feb 7, 2024, 12:49 IST
बुलढाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी ही समिती गठीत केली आहे.
या समितीचे कार्यक्षेत्र बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर, चिखली, खामगाव, जळगाव, सिंदखेड राजा, मलकापूर विधानसभा समितीचे कार्यक्षेत्र आहे जिल्हाधिकारी डॉ पाटील हे समितीचे अध्यक्ष आहेत. समितीत अपर पोलीस अधीक्षक बाबासाहेब महामुनी, साम टीव्ही चे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव, दिव्य मराठी चे जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार यांचा समावेश आहे.