मेल नर्सेस बचाव समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; काय आहे करण? 

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : DMER सरळ सेवा भरतीतील अधिपरीचारिका सेवा प्रवेश नियम 2025 मधील 80:20 लिंग आधारित अन्यायकारक नियम रद्द करण्यात यावे या सह अन्य मागण्यासाठी मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आहे.

11 जून 2025 रोजी DMER द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिपरीचारिका सेवा प्रवेश नियम 2025 मध्ये 80:20 लिंग विभाजक नियम लागू करण्यात आला असून हा नियम पुरुष परिचारिकावर अन्याय करतो व नर्सिंग व्यवसाय लिंग भेदभाव निर्माण करतो. याकरिता हा नियम रद्द करण्यात यावा या सह इतर मागण्यांसाठी आज 14 जुलै रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आली. मंगळवार तात्काळ निर्णय घेण्यात यावा अन्यथा लाखोंच्या संख्येने विधानसभेवर निदर्शने करण्याचा इशारा मेल नर्सेस बचाव समितीकडून देण्यात आला.

या आहेत मागण्या 

१) 80:20 लिंगविभाजक नियम तत्काळ रद्द करण्यात यावा 
२) नर्सिंग भरती ही केवळ शैक्षणिक गुणवत्ता व पात्रता आधारित लिंगनिरपेक्ष व संविधानबद्ध पद्धतीने पार पाडावी
३) पुरुष नर्सिंग अधिकार्‍यासाठी स्वातंत्र्य धोरण तयार करून त्यांना सन्माननीय प्रतिनिधित्वाची हमी देण्यात यावी 
४) संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक न्याय्य आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबवावी