पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना मिळणार अनोखी भेट! व्हाईस ऑफ मीडियाच्या सदस्यांना १० लाखाचे विमा कवच; प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांची माहिती...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी आपला लढा उभारणारी व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना अनोखी भेट देणार आहे. व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्ह्यातील सदस्यांना दहा लाखाचे विमा कवच देणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिली आहे.
 राज्य,देश नव्हे तर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हाईस ऑफ मीडियाच्या काम करत आहेत. डिजिटल स्वरूपामध्ये अतिशय पारदर्शक स्वरूपात हे सदस्य नोंदणी अभियान पार पडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक पत्रकार व्हॉईस ऑफ मीडियासोबत जोडले गेले आहेत.
पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण, घर, विविध कार्यशाळा ,आणि सर्वात महत्त्वाचे असलेल्या कल्याणकारी मंडळाच्या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडियाने आग्रही स्वरूपात काम करत आहे. अपघात ग्रस्त किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त असलेल्या पत्रकाराला , कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना थेट मदत देण्याचा उपक्रम संघटना राबवत आहे. यावर्षी पत्रकार दिनाच्या निमित्ताने व्हाईस ऑफ मीडियाच्या बुलढाणा जिल्ह्यातील सदस्यांना दहा लाखाचे विमा कवच संघटनेच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिली आहे.