त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला ; व्हॉईस ऑफ मीडियाचा बुलढाण्यात निषेध; मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर अचानकपणे भ्याड हल्ला झाला होता. या हल्ल्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडिया बुलढाणा शाखेच्या वतीने निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडणे अतिशय निंदनीय असल्याचे व्हॉइस ऑफ मीडियाने निवेदनात म्हटले आहे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
 निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या प्रकरणातील आरोपींवर विशेष सरकारी वकिलांच्या माध्यमातून खटला चालवण्यात यावा आणि दोषींना कठोर शासन व्हावे, जेणेकरून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांवर पुन्हा अशा प्रकारे हल्ले होणार नाहीत.
निवेदन देतेवेळी व्हाईस ऑफ मीडियाचे लक्ष्मीकांत बगाडे,कृष्णा सपकाळ, नदीम शेख, सुनील तिजारे, संजय जाधव, नितीन कानडजे, संदीप शुक्ला, गणेश उबरहंडे , निलेश राऊत, जमीर शाह, इरफान शाह, अखिल शहा, संदीप वानखेडे, निलेश शहाकार, मुजाहिद शाह,दिगंबर कंकाळ , अक्षय थिगळे , अनंता काशीकर आदी उपस्थित होते..