सहपालकमंत्री ना.सावकारे यांनी घेतला जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा..! 

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्याचे नवनियुक्त सहपालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री ना.संजय सावकारे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विकासकामे, योजना, प्रकल्पांसह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला. 
सहपालकमंत्री ना. सावकारे हे काल जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनीजिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा घेवून माहिती घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मुख्य वनसंरक्षक सरोज गवस, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांचेसह उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित आहेत.
सह पालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी या बैठकीत जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती,पर्यजन्यमान, पाऊसपाणी, अतिवृष्टी नुकसान, पंचनामे व मदत वितरण, पीक पेरणी, फळबाग लागवड, पीक विमा,जिल्हा वार्षिक योजना, लोणार, सिंदखेडराजा विकास आराखडा, डोंगरी भाग, जिगाव सिंचन प्रकल्प, पर्यटन यासह विविध विषयांचा आढावा घेतला.
या बैठकीच्या सुरुवातीला सहपालकमंत्र्यांनी सर्व प्रशासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा परिचय करुन घेतला. 
जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामे, प्रकल्प, योजना, उपक्रमांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.