एसटी विभागात रिक्त पदी रुजू करा नाहीतर आमरण उपोषण करणार! जीव गेला तरी चालेल! निवड झालेल्या युवकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा! जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेन

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेल्या निवड झालेल्या युवकांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना एसटी विभागात रिक्त पदी चालक वाहक म्हणून तात्काळ रुजू करावे,  रुजू न दिल्यास आमरण उपोषण करू असा इशारा चालक वाहक सरळ सेवा भरती मध्ये निवड झालेल्या युवकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. सदर निवेदन बुलडाणा जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह राज्य परिवहन महामंडळ विभाग यांना दिले 

कोरोनापूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाने विभागात प्रत्येक जिल्ह्यात चालक व भरती जाहीर केली होती. या भरतीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातून ४७२ रिक्त असलेल्या जागांवर उमेदवार भरण्यात येणार होते. त्याकरिता बुलडाणा राज्य परिवहन महामंडळ विभागाने जाहिरात प्रसिद्ध करून युवकांचे अर्ज भरून पूर्ण परीक्षा घेऊन निवड ४७२ जणांची  निवड केली होती. २०१९ मध्ये झालेल्या भरतीमध्ये निवड झालेल्या युवकांपैकी १३८ युवकांची वैद्यकीय चाचणी व प्रशिक्षण पूर्ण करून घेऊन त्यांना एसटी विभागात रुजू करण्यात आले . मात्र उर्वरित निवड झालेल्या युवकांना अद्यापही बुलडाणा एसटी महामंडळ विभागाने नियुक्ती दिली नाही.  चालक वाहक भरतीत निवड  झालेल्या युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे या युवकांना रिक्त जागांवर रुजू करावे याकरिता मुंबई  आझाद मैदानावर आंदोलन सुद्धा केले होते. त्यावेळी या युवकांना नियुक्ती देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा देण्यात आले होते. मात्र बुलडाणा एसटी विभागाला या आंदोलनाचा विसर पडला असून अद्यापही रुजू करून घेण्यात आले नाही. 

६०  युवकांची दोन वेळा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. वैद्यकिय चाचणी नंतर प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येते. प्रशिक्षासाठी न बोलवता अधिकारी फक्त वेळकाढूपणा  करीत युवकांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येईल असे   सांगून राज्य परिवहन बुलडाणा विभागाचे अधिकारी वेळ मारून नेत आहे.याबाबत विचारणा केल्यास बुलडाणा विभागाचे अधिकारी टोलवा- टोलवीची  उत्तरे देत आहे.

हाताला काम नाही निवड होवून रुजू करण्यात आले नाही त्यामुळे या युवकांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे मेडिकल झालेल्या युवकांना  प्रशिक्षण देऊन तात्काळ रुजू करा नाहीतर आपल्या कार्यालयासमोर २० फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करू  असा इशारा मुख्यमंत्र्यांसह , परिवहन मंत्री, व्यवस्थापकिय संचालक, मध्यवर्तीय कार्यलय, रा.प.मुंबई., उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती नागपुर,  महाव्यवस्थापक नियंत्रण समिती, अमरावती, आमदार बुलडाणा, बुलडाणा जिल्हाधिकारी, एसपी बुलडाणा, ठाणेदार शहर पोलीस स्टेशन, बुलडाणा यांना निवेदनात दिला आहे या निवेदनावर मधुकर शिंगारे, योगेश भोकरे, सचिन गवई, नीलेश लंबे, अक्षय पाचपोर,सुशील नगारे  यांच्यासह  सह्या असून मुन्ना बेंडवाल (शिवसेना नेते) व उमेदवार  उपस्थित होते.