महिलाच परिवर्तन घडविणार  जयश्रीताई शेळकेंचे प्रतिपादन!
पिंपरी गवळी येथे महिला बचतगटांचा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज सर्वच क्षेत्रात महिला मार्गक्रमण करीत आहेत. येणाऱ्या काळात समाजकारण, राजकारण, उद्योग, नोकरी अशा सर्वच क्षेत्रात महिला परिवर्तन घडविणार, असा ठाम विश्वास दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केला. 

तालुक्यातील पिंपरी गवळी येथे ९ मे रोजी दिशा बचतगट फेडरेशन आणि दिशा महिला अर्बनच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आयोजित महिला बचतगटांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. मेळाव्याला तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी महिला बचतगटांना ३५ लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. उर्हा येथील हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असलेल्या शेतकरी संदीप ढेकळे यांचा मेंदूज्वर आजाराने अकाली मृत्यू झाला. त्यांचा मुलगा सुदेश संदीप ढेळके वय (१२) याला शिक्षणासाठी जयश्रीताई शेळके यांनी दत्तक घेतले. 

यावेळी अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनील शेळके, माकोडीचे सरपंच गजानन कातोरे, माजी पं. स.सदस्य ईश्वरसिंग पवार, माजी सरपंच यादवराव दुडेकर, उद्योजक श्रीकृष्ण पाटील, श्याम पाटील सावळे, माजी सरपंच ग. म. वैराळकर, उल्हास हिवाळे, विजय पाटील, ग्रा. पं. सदस्य विनोद ढोण, शांताराम सातव, भागवत आटोळे, जयेश पाटील, अनिल खराटे, जयंत चोपडे, संदीप ढकचवळे, उल्हास पाटील, अर्चनाताई शेळके, अतिष इंगळे, शेख शरीफ, सुरेश काळे, सुधाकर बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक भारती कोल्हे यांनी केले. संचलन उज्वला आसणे, योगेश महाजन यांनी तर आभार वैष्णवी बोरसे यांनी मानले. 


पदापेक्षा विचार महत्वाचा 

गेल्या १५ वर्षांपासून मी  समाजकारण, राजकारणात सक्रिय आहे. कधीच कोणत्या पदाचा आग्रह धरला नाही. शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर माझे मार्गक्रमण सुरु आहे. पदापेक्षा मला विचार महत्वाचा असून विचारांशी तडजोड नाही. महिला माझी ताकद आहे. त्यांच्या पाठबळावर मी कोणत्याही संकटाचा सामना करु शकते.