बुलडाण्यात आज जनआक्रोश मोर्चा...! सकाळपासून रस्त्यांवर शुकशुकाट....

 

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी यासह बुलडाण्यातील त्रिशरण चौकात अपघाती निधन झालेल्या स्नेहलच्या अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी आज, १० मार्चला बुलढाण्यात जन आक्रोश मोर्चा धडकणार आहे. धर्मवीर युथ फाऊंडेशनच्या पुढाकारातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे..
   बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मीक कराड यांच्या गुंडांनी निर्घुण हत्या केली होती. या हत्याकांडाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करताना चे फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जनभावना आहे. या जनभावनेला वाट मोकळी करून देण्यासाठी बुलढाण्यात आज जन आक्रोश मोर्चा होत आहे. बुलडाणेकरांनी कडकडीत बंद संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयां प्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत...