जय अंबे ट्रॅव्हल्स कंपनीसोबत गेले होते चार धाम यात्रेला! बुलडाण्याचा एक भाविक अलकनंदा नदीत बुडाला
Oct 12, 2023, 17:28 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चार धाम यात्रेसाठी गेलेल्यांपैकी बुलडाण्याचा एक भाविक बद्रीनाथच्या अलकनंदा नदीत बुडाला. आज,१२ ऑक्टोबरला ही घटना घडली. दिलीप रघाणी( रा.बुलडाणा) असे भाविकाचे नाव आहे.
चिखली येथील जय अंबे ट्रॅव्हल कंपनीकडून चिखली व बुलडाणा येथील २४ जण बसने चार धाम यात्रेसाठी गेलेले आहेत. हे भाविक आज बद्रीनाथ मध्ये होते. सकाळी दर्शन झाल्यानंतर दिलीप रघाणी यांचा पाय घसरून ते नदीत पडले. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने काही क्षणात ते दिसेनासे झाले. उत्तराखंडच्या स्थानिक प्रशासनाची टीम दिलीप रघाणी यांचा शोध घेत आहे.