९० वर्षीय वृध्द महीलेसोबत भर दिवसा वाईट घडल! तो आला अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक! शिवणी आरमाळ येथील घटना; महिलांमध्ये भीतीचे वातावरण..
अंढेरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील शिवणी आरमाळ येथील एका वृध्देसोबत वाईट घडल..वाढत्या वयामुळे वृध्द महिलेला चालता फिरता येत नाही, त्याचाच फायदा एका भामट्याने घेतला. वृध्द महीलेसोबत घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवणी आरमाळ येथील रवी सखाराम आरमाळ यांच्या आई गोदावरी सखाराम आरमाळ (९० ) या ४ ऑगस्ट रोजी एकट्या घरी होत्या. त्यांना चालता फिरता येत नसल्याने व घरी कोणीच नसल्याने गावातील नाना सोनपसारे घरात आला. त्याने घरात घुसून गळ्यातील सोन्याची पोत देण्याची मागणी केली. यावेळी गोदावरी आरमाळ यांनी सोन्याची पोत देण्यास नकार दिल्याने तो घरातून निघून गेला.
दरम्यान, थोड्या वेळाने दुपारच्या वेळी सगळे शेतात असल्याचा फायदा घेत गावातील शामराव सोनपसारे आला, त्याने तोंड दाबले तसेच डावा हात पिळगळून गळ्यातील सोन्याची पोत ५ ग्रॅम, किंमत ३० हजार रूपये जबरदस्तीने तोडून घेऊन गेला. याबाबत संध्याकाळी यांचा मुलगा रवी सखाराम आरमाळ यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून भादंवि ३९४, ४५२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अरोपीस अटक करण्यात आली. अधिक तपास ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पीएसआय गजानन वाघ व फुसे करीत आहेत.