“राहुल बोंद्रे मेंटली डिस्टर्ब आहेत?”; भाजप प्रवेश रद्द होताच आ. श्वेता महालेंची बोचरी टीका, म्हणाल्या—‘दोन निवडणुका हरलेल्यांच्या येण्याने फायदा नव्हता!’
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची तयारी आधीपासूनच सुरू होती, “मग राहुल गांधींनी तेव्हाच फोन का केला नाही? तेव्हा का ते कार्यकर्त्यांसाठी धावून आले नाही?” असा सवालही महाले यांनी उपस्थित केला. बोंद्रे यांना स्वतःहून भाजपमध्ये यायचे होते. त्यांना त्यांच्या संस्था वाचवायच्या होत्या, असा दावा महाले यांनी केला. तसेच “मी चिखलाच्या राजकारणात लक्ष देणार नाही, पक्षाच्या संघटनात्मक कामातही लक्ष घालणार नाही,” असे राहुल बोंद्रे यांनी स्वतः सांगितले होते, असा दावाही त्यांनी केला.
‘दोन निवडणुका हरलेल्यांच्या येण्याने भाजपला फायदा नव्हता’
राहुल बोंद्रे यांच्या राजकीय वाटचालीवरही आमदार महाले यांनी थेट भाष्य केले. “ते दोन वेळा विधानसभेत पडले, नगरपालिकेतही त्यांची डाळ शिजली नाही. जो माणूस दोन निवडणुका हरतो, त्यांच्या येण्याने कोणत्या पक्षाचा फायदा होणार? ,” असे त्या म्हणाल्या. दरम्यान, राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे गेल्या काही दिवसांपासून चिखलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. बोंद्रे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, मुंबईकडे जाण्याची तयारी आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्याशी झालेला फोनवरील संवाद या घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली.
आता भाजप प्रवेशावरूनच आमदार श्वेता महाले यांनी केलेल्या या बोचऱ्या टीकेला राहुल बोंद्रे किंवा काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर मिळते, याकडे चिखलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.