राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या मेहकर शाखा स्थलांतरणाचा उदघाटन सोहळा उत्साहात; संदीप शेळके म्हणाले,आधुनिक तंत्रज्ञानासह तत्पर सेवेसाठी कटीबद्ध...
Updated: Feb 24, 2025, 13:04 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नव्या बदलांचा स्वीकार करीत सहकार चळवळ दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. सहकाराच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि तत्पर सेवेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राजर्षी शाहू मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
राजर्षी शाहू मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीच्या मेहकर शाखा स्थलांतराचा उद्घाटन सोहळा २३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके यांच्या हस्ते फीत कापून उद्धाटन करण्यात आले. डोणगाव रोडवरील सावजी कॉम्प्लेक्समध्ये हा कार्यक्रम झाला.
महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. संस्थेच्या यशात खातेदार, ठेवीदार, ग्राहक, सभासदांचे मोठे योगदान असल्याचे भाऊसाहेब शेळके यांनी सांगितले. इतर मान्यवरांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. यानुषंगाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास महाराष्ट्र अर्बनचे अध्यक्ष ऋषीकेश जाधव, माजी जि. प. सदस्य आशिष रहाटे, शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष निंबाजी पांडव, शहराध्यक्ष किशोर गारोळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय घनवट, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या संचालिका डॉ. माधवी जवरे, प्रशांत सावजी, कलीम खान, कैलास जाधव, सारंग माळेकर, लक्ष्मण मंजुळकर, भास्करराव काळे, गजानन धोंडगे, श्रीकृष्ण देवकर, गणेश देवकर, गजानन कृपाळ, स्वप्नील काळे, प्रा. अनिल ढगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. संचालन विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांनी केले.