जूनच्या पहिल्या ४ दिवसांत बुलडाणा जिल्ह्यातून ११ जणी गायब! जातात कुठे? करतात काय? पहा तुमच्या परिचयातील कुणी दिसत का...
Jun 5, 2026, 12:04 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातून बेपत्ता मुली आणि महिलांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. "बुलडाणा लाइव्ह" ने सर्वप्रथम ही समस्या चव्हाट्यावर आणल्यानंतर आता समाजमनात हा गंभीर चर्चेचा मुद्दा बनला आहे. विशेष म्हणजे बेपत्ता होणाऱ्यांमध्ये केवळ अविवाहित तरुणीच नव्हे तर विवाहिता, मुले बाळे असणाऱ्या महिला देखील असल्याने हा सामाजिक चिंतेचा विषय बनला आहे. जून महिन्याच्या पहिल्या चार दिवसात बुलडाणा जिल्ह्यातून ११ जणी गायब झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यात झाली आहे.. शोधाशोध करून थकल्यानंतर कुटुंबीयांनी या तक्रारी दिल्यात..!
शेगावच्या देशमुख पुरा भागातून प्रगती द्वारकेश्वर गीते ही १८ वर्षीय तरुणी गायब झाली आहे. नांदुरा बस स्टॅन्ड वरून आदिती शशिकांत तायडे (२१), नांदुऱ्याच्या राणा बेकरी जवळून दिव्यानी शिवदास सोनोने, खामगावच्या घाटपुरी भागातून सौ प्रियंका सुरज कराळे, लोणार तालुक्यातील किन्ही येथून वैष्णवी जगन्नाथ तारे, खामगाव च्या घाटपुरी भागातून सौ. शोभा प्रमोद शिंदे, मलकापूर तालुक्यातील वरखेड येथून स्नेहा सुखदेव वानखेडे या बेपत्ता झाल्या आहेत. यांच्यापैकी कोणी दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.