मुलाच्या जिवाचे बरेवाईट झाले तर सरकार जबाबदार!

रविकांत तुपकरांच्या आईला अश्रू अनावर!!
 
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निवासस्थानाबाहेर अन्‍नत्याग आंदोलन करत असलेले रविकांत तुपकर यांची तब्येत आज, १९ नोव्‍हेंबरला प्रचंड खालावली आहे. रविकांत तुपकर यांच्या आई गीताबाई चंद्रदास तुपकर यांना मुलाची खालावलेली तब्येत पाहून अश्रू अनावर झाले.

पहा व्हिडिओ ः 

तो शेतकऱ्यांच्या मालासाठी लढतोय. तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, डाकू-गुंडाचा नाही. आम्ही कोणताही गुन्हा केला नाही. सगळ्या शेतकऱ्यांसाठी तीन दिवस झाले त्याने अन्‍नत्याग केला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. तो गुंडगिरी करीत नाही. त्याच्या आई -वडिलांच्या कष्टाला तो भाव मागत आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. त्याची दखल सरकारने घ्यायला पाहजे. त्याला जीवाला काही कमीजास्त झाले तर त्याला सरकार जबाबदार राहील. माझा मुलगा आहे तो. माझ्या पोटात आतडे तोडताय, असे म्हणताना रविकांत तुपकरांच्या आईला अश्रू अनावर झाले.