किती रे बापा घाण..! देऊळगाराजा च्या नामवंत डॉक्टरचा अश्लील व्हिडिओ व्हायरल! डॉक्टरचा दावा, म्हणे तो मी नव्हेच....

 

देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही दिवसांपूर्वी चिखलीतील एका डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता देऊळगाव राजा येथील एका नामवंत डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अतिशय अश्लील आहे..डॉक्टर नको ते करतोय अन् स्वतःच त्या कृत्याचा व्हिडिओ शूट करतोय असं व्हिडिओत दिसतय..दरम्यान व्हिडिओत ज्या डॉक्टरचे तोंड दिसते त्याने तो मी नव्हेच..असा दावा केल्याचे सांगण्यात येतेय .सदर व्हिडिओ एडीट केल्याचे डॉक्टरचे म्हणणे असल्याचे सूत्रांनी सांगितले...
हल्लीचा सोशल मीडियाचा जमाना आहे. कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही लोकांना खाजगी क्षणांचे व्हिडिओ बनवण्याचा छंद असतो, मात्र ते अंगलट आल्याचे याआधी अनेकदा समोर आले आहे. मेहकरच्या एका नेत्याचाही व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. काही दिवसाआधी चिखलीच्या एका डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, आता देऊळगावराजा येथील एका डॉक्टरचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झालाय..या व्हिडिओत डॉक्टरसोबत एक महिला सहकारी देखील आहे..मात्र हल्लीच्या एडिटिंगच्या जमान्यात तो व्हायरल व्हिडिओ खराच आहे असे सांगता येत नाही..दरम्यान याप्रकरणी डॉक्टरांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डॉक्टर म्हणतात...
दरम्यान थोड्या वेळापूर्वी संबंधित डॉक्टरांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध देऊन व्हायरल होत असलेला व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाशी आपला दूर दूर पर्यंत संबंध नाही, कुणीतरी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून संबंधित व्हिडिओत आपला चेहरा वापरल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आपल्याला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. व्हिडिओ एडिट करून व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील डॉक्टरांनी सायबर पोलिसांत केली आहे..दरम्यान या प्रकरणामुळे देऊळगाव राज्यात एकच खळबळ उडाली आहे..सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत..