BREAKING बुलढाणा शहरातील होर्डींग हटविण्यास सुरुवात ! 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मुंबईत वादळी पावसामुळे होर्डीग पडून जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत होर्डिंग फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या उपस्थितीमध्ये सर्क्युरल रोडवरील फलक हटविण्यास सुरुवात झाली आहे. 
मुंबईत वादळाच्या तडाख्यात सोमवारी होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला तर जखमींची संख्या सुद्धा जास्त आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांनी जिल्ह्यातील १३ तहसीलदार, ११ नगरपालिका व दोन नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते.