दारूला पैसे भेटले नाही म्हणून केलं चुकीचं काम! मोताळ्याच्या युसुफ विरुद्ध गुन्हा ! 

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दारूच्या आहारी गेलेला माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. अशी असंख्य उदाहरणे मिळू शकतात . मात्र सलून चालकाने दारुसाठी १० रुपये दिले नाही म्हणून मोताळाच्या एका मद्यप्रेमीने सलून दुकानाच्या चक्क काचा फोडल्या, यासंदर्भात सलूनमालक दीपक वाशिमकर यांनी बोरखेडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार शेख युसुफ शेख जावेद (वय२५वर्ष) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
   हा संपूर्ण प्रकार २५ जानेवारीला घडला होता. रात्री उशिरा शेख युसुफ हा दीपक वाशिमकर यांच्या खरबडी रोडवर असलेल्या दुकानामध्ये गेला, त्यावेळी मला दारुसाठी १० रुपये द्या असे त्याने दीपक यांना म्हटले, मात्र तू नेहमीच दारुसाठी पैसे मांगतो, असे म्हणून दीपक यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामूळे संतप्त झालेल्या युसुफने चक्क सलून दुकानाच्या काचा फोडल्या. त्यामध्ये सलून मालक दीपक वाशीमकर यांचे ५ हजारांचे नुकसान झाले, इतकचं नाही तर त्यांना शेख युसूफ याने जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. त्यांनतर दीपक वशिमकर यांनी २५ जानेवारीला युसूफची तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत