पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा गुंधा ग्रामवस्तीत निषेध! 

 
 
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काश्मीरमधील पहलगाम येथे पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून 28 निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केली. या अमानवी घटनेच्या निषेधार्थ लोणार तालुक्यातील गुंधा ग्रामवस्तीत 26 एप्रिल रोजी उस्फूर्तपणे निषेध सभा घेण्यात आली.
सभेत पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारच्या कठोर निर्णयांचे समर्थन करत, सरकारच्या भूमिकेचे स्वागत ग्रामस्थांनी केले. शेवटी पसायदानाचे पठण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जागरूक रहा
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवप्रसाद सारडा, माजी सभापती केशवराव फुके, सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.