जिल्ह्यासाठी गौरवास्पद बातमी! आर्चरी खेळाडू प्रथमेश जावकार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

 
 बुलडाणा (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)जिल्ह्यातील आंतराष्ट्रीय आर्चरी खेळाडू प्रथमेश समाधान जावकार यांच्या कामगीरीची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन 2023-24 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
  पुरस्कार वितरण सोहळा दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवछत्रपती क्रीडा क्रीडापीठ (बॅडमिंटन हॉल) म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व इतर सन्माननीय मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. पुरस्काराचे स्वरुप 3 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ प्रदान करुन मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथमेश समाधान जावकर यांना सन्मानीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बी.बी. महानकर यांनी दिली.