मेहकर-जालना महामार्गावर भरधाव मालवाहू वाहनाची धडक; २६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू!

 
 रोहेरी बुद्रुक (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर-जालना राज्य महामार्गावर रोहेरी बुद्रुकजवळ सोमवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत २६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सचिन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावर न थांबता वाहनासह पसार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  ADVT 👆

जेवणासाठी थांबलेला असताना काळाचा घाला!

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील १४ कामगार रोजगारासाठी पुण्याला जात होते. प्रवासादरम्यान हे कामगार रोहेरी बुद्रुकजवळील राजमाता हॉटेल येथे जेवणासाठी थांबले होते. याचवेळी सचिन कुमार काही अंतरावर फिरण्यासाठी गेला असताना जालन्याहून मेहकरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत सचिन गंभीर जखमी झाला. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच संबंधित वाहनचालकाने घटनास्थळी न थांबता वाहनासह पळ काढला. रोजगारासाठी परराज्यातून निघालेल्या तरुणाचा प्रवासातच दुर्दैवी अंत झाल्याने सहकारी कामगारांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

किनगाव राजा पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार संजय मारोतीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अपघातानंतर पसार झालेल्या मालवाहू वाह