लगीन घरच्यांनो लग्न लवकर लावा! आज आणि उद्या जिल्ह्यात वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.....
May 11, 2025, 13:31 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या लग्नसराई सुरू आहे. आज ११ आणि उद्या १२ मे या लग्नाच्या दाट तारखा आहेत.. मात्र आज आणि उद्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे...
प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारा प्राप्त हवामान अंदाज जिल्हा कृषी हवामान विभागाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आला आहे. त्यानुसार आज ११ मे आणि उद्या १२ मे रोजी बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, पशुधनाची काळजी घ्यावी. विजा चमकत असताना झाडाखाली उभे न राहता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. लगीनघरच्या मंडळींनी शक्यतोवर लग्न लवकर लावावे असेही आवाहन करण्यात आले आहे...