बुलढाण्याच्या चिंचोले चौकातील श्रीकृष्ण पावभाजीवाले गणेश सुरडकर शुक्रवार पासून गायब! 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा शहरातील चिंचोले चौक येथील चौपाटीवरील श्रीकृष्ण पावभाजीवाले गणेश विठ्ठल सुरडकर (२९ वर्ष) हे बेपत्ता झाले आहे. त्यांची पत्नी उषा सुरडकर यांनी आज सोमवारी सकाळी पोलीस स्टेशन गाठले. पती बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. 
  गणेश विठ्ठल सुरडकर हे शहरातील शाम नगर भागातील रहिवासी आहे. तेथील दुमजली घरावर त्यांचे भाऊ गजानन सुरडकर हे खाली राहतात तर गणेश हे वरच्या मजल्यावर राहतात. मागील कितेक दिवसांपासून पावभाजी चे दुकान लावून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, शुक्रवारी (दि.१२) दीड वाजता घरून त्यांनी डब्बा घेतला. दुकान उघडतो असे पत्नीला सांगून जवळील पल्सर गाडीने ते बाहेर पडले. रात्री उशिर झाला तरी ते परतले नाही. पत्नी उषा सुरडकर ह्या वाट पाहून थकल्या. शेवटी त्यांनी गणेश सुरडकर यांना अनेक फोन केले. रिंग जात होती, पण गणेश यांनी फोन काही उचलला नाही. घरचे सगळे शोधून शोधून थकले.
पण गणेश यांचा पत्ताच लागला नाही. वारंवार फोन केला असता त्यांचा फोन देखील बंद येत असल्याचे त्यांचे भाऊ गजानन सुरडकर हे सांगतात. तीन दिवस झाले गणेश सुरडकर घरातून निघून गेले. अखेर त्यांचे भाऊ गजानन, पत्नी उषा यांनी आज सोमवारी सकाळी १०:३० वाजता शहर पोलीस स्टेशन गाठले. गणेश सुरडकर हे बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. भाऊ गजानन सुरडकर यांनी बुलडाणा लाइव्हला गणेश यांचा फोटो दिला आहे. वरील फोटोतील व्यक्ती गणेश सुरडकर हे कुठे आढळून आल्यास 92262 76621 या क्रमांकावर संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले.