अखेर बिबट्या अडकला जाळ्यात! विहिरीवर पाणी प्यायला गेला अन्...!. अमडापूरची घटना 

 
 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. कालच अमडापूर जवळच्या पांढरदेव मध्ये बिबट्याने गाय फस्त केली होती.. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी सुरू होते.. अखेर आज एक बिबट्या जाळ्यात अडकला आहे.. मात्र तो वनविभागाच्या जाळ्यात नव्हे एका पडक्या विहिरीवर संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्यात अडकला आहे..
Related img.

अमडापूर शिवारातील जांभूळ खोरा येथे एका पडक्या विहिरीच्या भोवती संरक्षणासाठी जाळे लावण्यात आले होते. बिबट्या विहिरीत पाणी पिण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करीत होता आणि त्यातच तो त्या जाळ्यात अडकला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचत आहेत..