कर्नल सोफिया कुरेशी यांचा अवमान करणाऱ्या मंत्री विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – लोणार शिवसेनेचे राष्ट्रपतींकडे निवेदन...

 
 लोणार (प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय थलसेनेच्या वीर महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांचा अपमान करणारे वक्तव्य करणाऱ्या मध्यप्रदेशचे सामाजिक न्याय मंत्री कुवर विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना मंत्रीपदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे.

या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने लोणार तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली व तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
मंत्री विजय शाह यांनी महू (म.प्र.) येथील सभेत कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी धार्मिक द्वेष पसरवणारे आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप असून, त्यांनी केलेले विधान हे भारताच्या सैन्याचा व महिला अधिकाऱ्यांचा अवमान करणारे आणि देशद्रोही असल्याचा आरोप करण्यात आला.
या निदर्शनात डॉ. गोपाल बछिरे, एड. दीपक मापारी, गजानन जाधव, लूकमान कुरेशी, तानाजी मापारी, अमोल सुटे, श्रीकांत मादनकर यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.