चेहऱ्यावर नका जाऊ! जिल्हा स्त्री रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक खादाड निघाला! ४८ हजार खातांना रंगेहाथ पकडला! ड्युटीवर लावल्याचा मोबदला म्हणून मागत होता ८ टक्के...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक सचिन वासेकर याला आज बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना रंगेहाथ पकडले. एका कंत्राटी डॉक्टरकडून ४८ हजार घेतांना त्याला पकडण्यात आले. धाड नाक्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
                            जाहिरात 👆
  एसीबी ने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार जिल्हा स्त्री रुग्णालयात कंत्राटी तत्वावर डॉक्टर आहेत. तक्रारदार डॉक्टरांना ३ महिन्याचे असे एकूण पगाराचे ६ लाख प्राप्त झाले होते. मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयाचा लाचखोर वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन वासेकर हा डॉक्टरांना ड्युटीवर लावल्याचा मोबदला म्हणून ६ लाखाचे ८ टक्के असे ४८ हजार रुपये मागत होता. 
   तक्रारदार डॉक्टर यांनी याप्रकरणी बुलडाणा एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची खात्री करण्यासाठी आधी पडताळणी कारवाई केली, त्यात वासेकर याने लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर धाड नाक्यावर सापळा रचण्यात आला. त्यात डॉक्टरकडून लाचखोर सचिन वासेकर ४८ हजार घेतांना रंगेहाथ पकडला गेल्या. त्याच्या विरुध्द बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.