साहेब हे तुम्हाला तरी पटतंय का? सांगा ! क्लास 1 ऑफिसरही उघड्यावरच करतात.....! बुलडाण्याच्या प्रशासकीय इमारतीतील प्रकार

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा येथील प्रशासकीय इमारतीत दररोज शेकडो नागरिक विविध विभागातील कार्यालयात आपली कामे घेऊन येतात. परंतु दिवसेंदिवस इमारतीतील अस्वच्छता आणि जीर्ण इमारत पाहून नागरिक वैतागले आहेत. प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृहांची अवस्था तर एवढी बेक्कार झाली असून क्लास 1 अधिकाऱ्यांना देखील चक्क उघड्यावर लघुशंका उरकावी लागत आहे. अस्वच्छतेने कळस गाठला असून संबंधित प्रशासनाचे यावर दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
जिल्हा मुख्यालयातील प्रशासनामध्ये अतिशय महत्त्वाची इमारत म्हणजे प्रशासकीय इमारत. प्रशासकीय इमारतीमध्ये विविध विभागाचे एकूण १६ कार्यालय आहेत. कामगार, वनीकरण, धर्मदाय आयुक्त, भूमी अभिलेख, रेल्वे आरक्षण, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यासह इतर काही महत्त्वाची असे एकूण १६ विभाग आहेत. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करताच एका कोपऱ्यात दिसून येणारा कचऱ्याचा ढीग आणि डोळ्यांसमोर दिसणाऱ्या अस्वच्छ भिंती हे चित्र किळसवाणे असून नेहमी नेहमी तेच पाहून वैताग आला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
साहेब तुम्हाला तरी पटतय का? 
 १६ विविध विभाग म्हणजे किमान १६ अधिकारी, प्रत्येक कार्यालयातील कर्मचारी देखील आलेच. आपापल्या विभागात जाण्यासाठी अधिकाऱ्यांनाही पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्याला लागून असलेले लाकडे कधी उन्मळून कोसळतील याचा नेम नाही, न्हवे तर अधिकाऱ्यांना इथल्या दुर्गंधीचा वास येत नाही का? असा सवालही उपस्थित होत आहे. यामुळे साहेब, तुम्हीच सांगा तुम्हाला तरी पटतंय का ? असा सवाल उपस्थित होत आहे.