जिल्हावासियांनो सावधान! बुलडाणा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट! सोसाट्याचा वारा अन् विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता...
May 14, 2025, 14:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट दिला आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वेगवेगळ्या भागात अवकाळीचा कहर सुरू आहे. त्यामुळे लग्नसराईत देखील विघ्न येत आहे. आता हवामान विभागाने वर्तवलेल्या ५ दिवसीय हवामान अंदाजानुसार १४ मे रोजी बुलडाणा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांना हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आज काही ठिकाणी ५० ते ६० पती तास किलोमीटरने सोसाट्याचा वारा वाहणार आहे. शिवाय विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
सावध रहा....
दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याची सूचना केली आहे. पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दारे यापासून दूर रहा. हवामान बिघडल्यानंतर सुरक्षित ठिकाणी थांबा. वातावरण खराब असताना शेतीची कामे तात्पुरते थांबवा असे आवाहन करण्यात आले आहे..