धोत्रा भणगोजी चे ग्रामस्थ रस्त्याला वैतागले! सांडपाणी रस्त्यावर, दररोज दुचाक्या घसरतात.. 

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथील ग्रामस्थ रस्त्याच्या समस्येला वैतागले आहेत. वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे..
   धोत्रा भणगोजी येथील बसस्थानकाजवळ गावातील सांडपाणी रस्त्यावर येते. सांडपाण्याची नियोजन ग्रामपंचायतीने करणे अपेक्षित असताना तसे मात्र होत नाही. हे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने या वर्दळीच्या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना त्याचा त्रास होतो. दररोज कितीतरी दुचाक्या या सांडपाण्यामुळे घसरून त्यांचे अपघात होतात, त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.