ठरलं...! स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी सुनील अंबुलकर यांच्या खांद्यावर; एसपी निलेश ताबेंचा निर्णय...
Jul 1, 2025, 12:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनात बदल्यांचे वारे वाहत आहे. नवे एसपी निलेश तांबे नव्याने बुलढाणा जिल्हा पोलीस दलाची बांधणी करत आहेत... जिल्हा पोलीस दलातील महत्त्वाचा भाग असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदी आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे...याआधी अशोक लांडे यांनीदेखील जबाबदारीला न्याय दिला होता..श्री. लांडे यांची बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे..
नव्याने एलसीबीची धुरा सांभाळणारे सुनील अंबुलकर यांनी खामगाव शहर, जळगाव जामोद याठिकाणी ठाणेदार म्हणून छाप सोडली आहे.. सध्या ते जिल्हा विशेष शाखेत कार्यरत होते. आता त्यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे...