अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन! तुमच्या ओळखीतील आहे का? पहा...
May 21, 2026, 19:12 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मृत व्यक्ती अंदाजे 50 वर्षीय पुरुष असून तो वरवंड येथील दिव्य प्रकल्प आश्रमात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. दिव्य सेवा प्रकल्प आश्रम चे संचालक अशोक काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती अनोळखी व बेवारस असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचा पत्ता दिव्या फाऊंडेशन, वरवंड, ता. जि. बुलढाणा असा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मर्ग क्रमांक २५/२०२६ अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कक्षसेवक यांच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत व्यक्तीची ओळख पटून त्याच्या नातेवाईकांचा शोध लागावा यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास तपासी अधिकारी पोहेकॉ कैलास ऊगले यांच्याशी ८८८८८११७१४ किंवा ८८३०२६५२१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.