DCM एकनाथ शिंदेंचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम ठरला! आज इसरूळ येथे येणार! संत चोखोबारायांच्या चरणावर ठेवणार माथा! हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटलांचे आवाहन....
दिनांक १० मे पासून सुरू झालेला हा सोहळा १८ मे पर्यंत चालणार आहे. सकाळी १० ते १२ आणि रात्री ८ ते १० या दोन सत्रात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरीकिर्तन या सोहळ्यात होत आहे. या सोहळ्याचे विशेष म्हणजे राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून शिवचरित्र कथा होत आहे. या शिवचरित्र कथा कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती होणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कालच अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी.महामुनी यांनी इसरूळ येथे येत बंदोबस्ताचा आढावा घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी सव्वा दोन वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर हेलिकॉप्टने पावणे ३ वाजता इसरूळ येथील हेलिपॅड वर पोहचणार आहेत. दुपारी ३ ते ५ यावेळेत ते संत चोखोबाराय मंदिर परिसरात सुरू असलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहतील, त्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.