खामगाव ग्रामीणचे ठाणेदार किशोर तावडे यांची कन्या कु. देवयानी तावडेची जिल्हास्तरावर चमक; जलतरण स्पर्धेत रौप्यपदक पटकावले
Oct 11, 2026, 17:22 IST
खामगाव(भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पोलीस निरीक्षक किशोर तावडे यांची कन्या कु. देवयानी किशोर तावडे हिने आपल्या यशाने पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत देवयानी हिने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावत रौप्यपदक प्राप्त केले आहे. ५ ऑक्टोबर रोजी जी.एस. कॉलेज, खामगाव येथे झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हाभरातील अनेक नामांकित शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत देवयानी हिने सर्वांना मागे टाकत आपल्या उत्कृष्ट जलतरण कौशल्याची चुणूक दाखवली. देवयानी सध्या खामगावच्या
एस.एस.डी.व्ही. (SSDV) हायस्कूल येथे इयत्ता ९ वी मध्ये शिकत असून अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही ती अव्वल असल्याचे तिने सिद्ध केले आहे. देवयानीच्या या घवघवीत यशामुळे तावडे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच शाळेच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.