'गोल्या'ची आता उलटी गिनती? भाजपच्या मंदार बाहेकर- अनिल जाधव यांनी पोलिसांकडे धाव घेताच खळबळ; कठोर कारवाईची जोरदार मागणी!
फेसबुकवरील बदनामीकारक पोस्टप्रकरणी तक्रारींचा भडिमार...!
तक्रारीनुसार, संबंधित फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा शासकीय अधिकारी विद्याधर महाले यांच्याबाबत कोणताही ठोस पुरावा नसताना तथ्यहीन, खोटे आणि बदनामीकारक आरोप करण्यात आले आहेत. जाणीवपूर्वक त्यांची सामाजिक, सार्वजनिक आणि शासकीय प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या पोस्टमुळे समाजात संभ्रम, गैरसमज आणि द्वेषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेलाही बाधा पोहोचू शकते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मनोज लाहुडकर उर्फ 'गोल्या' यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या सार्वजनिक वर्तनामुळे त्यांना सरपंचपदावरून निष्कासित करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले असून भ्रष्टाचार, दिरंगाई, मारामारी यांसारख्या विविध प्रकरणांमध्ये त्यांच्यावर आरोप असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांना तडीपार करण्याची मागणीदेखील यापूर्वी पोलिसांकडे करण्यात आली होती, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, संबंधित फेसबुक पोस्ट हटविण्यात यावी आणि डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवण्यात यावेत, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीची विनाकारण बदनामी करणे, खोटी माहिती प्रसारित करणे आणि समाजात द्वेष अथवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य असून अशा प्रकारांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना अनेक नागरिकांनीही उपस्थित राहून कारवाईच्या मागणीला पाठिंबा दर्शविला व स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दत्ता पाटील, चंद्रकांत बर्दे, मुन्नाजी बेंडवाल, अॅड. मोहन पवार, अड. सुनील देशमुख, नारायणराव हेलगे, सुरेश चौधरी, अंबादास घेवंदे, संजय जुंबड, आनंदा डुकरे, किरण नाईक, मुकुंद देशपांडे, बाळू ठाकरे, मोहम्मद अकील खान, समीर खान, इम्रान हुसैन, उमेश पाटील, कौस्तुभ उमेश पाटील, अभिषेक वायकोस आणि गणेश गवळी उपस्थित होते.
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित खोट्या, बदनामीकारक आणि दिशाभूल करणाऱ्या फेसबुक पोस्टप्रकरणी उदयनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज लाहुडकर उर्फ 'गोल्या' यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाणे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, संबंधिताविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
भाजपा बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात, तर भाजपा धाड मंडळाचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकांकडे स्वतंत्र तक्रार सादर केली आहे.