स्मार्ट मीटरच्या विरोधात कंत्राटी कामगार ऐकवटले; महावितरण समोर निदर्शने...!
Jan 23, 2025, 14:55 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्यात येत असून मीटर रीडर कंत्राटी कामगारांकडून याला विरोध करण्यात आला आहे. मीटर लावणे तात्काळ थांबवण्यात यावे याकरिता आज बुलडाणा महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. १ फेब्रुवारी पर्यंत निर्णय न घेतल्यास काम बंद करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला.
स्मार्ट मीटरला पुन्हा एकदा बुलढाण्यात विरोध सुरू झाला आहे.. मध्यंतरी या संदर्भात मोठा विरोध झाल्यानंतर ते न लावण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर फिरवला आहे..पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्याने मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटना असंतोषाचे वातावरण आहे. स्मार्ट मीटरमुळे रोजगारावर गदा येत असल्याने या विरोधात 1 फेब्रुवारीपासून काम बंद करण्याचा निर्णय मीटर रीडर कंत्राटी कामगारांनी घेतला आहे. आज बुलढाणा महावितरण कार्यालयासमोर मीटर रीडर कंत्राटी कामगारांनी निदर्शने करत आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अभियंता यांना दिले आहे..