संसदेचा अवमान प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मोताळ्यात निषेध
Mar 16, 2026, 10:26 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी संसदेचा अवमान केल्याप्रकरणी आज दि. १५ मार्च २०२६ रोजी मोताळा तालुका भाजपच्या वतीने स्थानिक बस स्टँड चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली व घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात "संसद का अपमान नही सहेगा हिंदुस्तान " "राहुल गांधी मुर्दाबाद" च्या घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध करण्यात आला.
संसद ही देशातील सर्वोच्च लोकशाही संस्था असून तिची प्रतिष्ठा, परंपरा आणि मर्यादा जपणे ही प्रत्येक लोक प्रतिनिधीची जबाबदारी आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काँग्रेस नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मकर प्रवेशद्वारा बाहेर चहा-बिस्कीटासह ‘चाय पार्टी’चे आयोजन करून संसद परिसराचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाही संस्थांचा असा अवमान करणारे हे कृत्य अत्यंत निषेधार्ह असून याविरोधात भाजपा ठीक ठिकाणी रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांच्या निषेध नोंदवित आहे.
यावेळी देशातील घरगुती गॅसच्या दरांबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून खोटा प्रचार करण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे,परंतु पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला ऊर्जा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे, हे वास्तव जनतेसमोर स्पष्ट आहे अश्या प्रतिक्रिया भाजपा पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या.
या आंदोलनात मोताळा मंडळ अध्यक्ष सचिन शेळके, भाजपा जिल्हा सचिव अशोक किंन्होळकर, ज्येष्ठ नेते तुळशीराम मापारी, भाजयुमो तालुकाध्यक्ष दत्ता पाटील, गणेशभाई जवरे,दादाराव जुनारे, सुभाषसिंग राजपूत, अमोल परमार, तुकाराम राठोड, पुरुषोत्तम दाते, संतोष वाढे, गणेश बिचकुले, धनंजय बिहारी, अक्षय पैसोडे, दीपक किरोचे, भुरा ठाकुर, विजय पाटील,वेदांत शेळके, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.