बुलढाणा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; चेन स्नॅचिंग प्रकरणातील सोन्याची चैन फिर्यादीकडे सुपूर्त...

 

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – बुलढाणा शहरात रात्रीच्या सुमारास झालेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा लावत शहर पोलिसांनी चोरट्यांना अटक करून चोरीस गेलेली दिड तोळ्याची सोनसाखळी (किंमत अंदाजे ९० हजार रुपये) हस्तगत केली केली. सोनसाखळी सुमीत वसंता अंभोरे यांच्याकडे न्यायालयीन आदेशानुसार सुपूर्त करण्यात आली.
ही घटना दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी घडली. फिर्यादी सुमीत अंभोरे (वय ३०, व्यवसाय – इंजिनिअर, रा. तार कॉलनी, बुलढाणा) हे त्यांच्या आत्याभाऊसोबत चिखली रोडवरील हॉटेलवरून जेवणासाठी गेले होते. रात्री ११.३० वाजता परतत असताना त्रिशरण चौकाजवळ दोन अनोळखी इसमांनी “तुम्ही आमच्या गाडीला धडक दिली” असे म्हणत वाद घालून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून त्यांच्या बजाज पल्सर २२० मोटारसायकलवरून मलकापूर रोडने पळ काढला.
या प्रकाराची नोंद २१ फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवि राठोड, तपास अधिकारी सपोनि जयसिंग राजपूत, डीबी पथकाचे पो.उ.नि. रवि मोरे, पो.कॉ. काकडे , युवराज शिंदे, विनोद बोरे , कौतीक बोर्डे व चालक पोहेकॉ. रमेश वाघ यांनी कौशल्याने तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली आणि संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
१९ मे २०२५ रोजी, मा. न्यायालयाच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक रवि राठोड व शहर पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सोन्याची साखळी परत फिर्यादीकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी फिर्यादी अंभोरे यांनी पोलिस विभागाबद्दल कृतज्ञता व समाधान व्यक्त केले.