BIG BREAKING एस.पी.विश्व पानसरे यांच्या बदलीवर कॅट ने दिली स्थगिती! पुन्हा पानसरेच जिल्हा पोलीस दलाचे बॉस...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल,२२ मे रोजी एसपी विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली होती. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून निलेश तांबे यांना जबाबदारी देण्यात आली होती. काल,रात्रीच निलेश तांबे यांनी बुलढाण्यात येऊन पदभार स्वीकारला होता..मात्र तांबे यांचे बुलढाणा पोलीस अधीक्षकपद औटघटकेचे ठरले आहे.. केवळ ८ महिन्यात बदली झाल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना एसपी विश्व पानसरे यांची होती.. बदलीच्या विरोधात ते कॅट मध्ये गेले होते..आज त्यावर सुनावणी होऊन काल करण्यात आलेल्या बदलीवर कॅट ने पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे..त्यामुळे पुन्हा एकदा विश्व पानसरे हेच जिल्ह्याचे एसपी राहतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे...दरम्यान एसपी विश्व पानसरे राजकीय दबावाला पुरून उरल्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे...