बुलढाणा पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; दिसला त्याला चावला ; जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी; 14 जणांना घेतला चावा.!

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने आज दिवसभरापासून चांगलाच हैदोस घातला आहे. शहरातील विविध भागातील तब्बल 14 जणांना चावा घेतल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळपासून एकापाठोपाठ एक रुग्ण दाखल झाले हे रुग्ण कुत्रा चावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. सर्वांना चावणारा कुत्रा एकच असल्याचे समजते या कुत्र्याला स्थानिकांनी मारून टाकल्याचेही सांगण्यात आले आहे. अशी आहेत रुग्णांची नावे आहे. सुरज शिवाजी पवार, सुमन दिगंबर कोरडे, धुर्वी जाजू कोरडे, आकाश भगवान देठे, सतीश रमेश परसे, गौरव राजेंद्र शेळके, कार्तिक नेमाने, भीमराव वाघ, शेख हाफीस शेख सलीम, देविदास तांबे, सुरेखा लहाने, कुसुम पवार, हिमांशू गुप्ता, मोहन बोर्डे असे कुत्र्यांनी चावा घेतलेला लोकांची नाव आहे.