अमली पदार्थ विरोधी दिनी बुलढाणा पोलिसांकडून जनजागृती! शहरातून काढली मोटरसायकल रॅली! एसपी निलेश तांबेंचा पुढाकार....

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने 'मिशन परिवर्तन' बाईक रॅलीने जनजागृती करीत प्रारंभ करण्यात आला. या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरुवात केली होती.
गांजा, भांग, गुटख्यासह अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जिल्हा पोलीस दलाने शहरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने बुलढाणेकरांचे लक्ष वेधले होते. शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. यावेळी नशा कत्ल करता है, अंमली पदार्थांचे सेवन टाळा. ड्रग्ज फ्री बुलढाणा, से नो टू ड्रग्ज या आशयाचे सामाजिक संदेश देणारे फलक दिसुन आले. ही रॅली शहरातील त्रिशरण चौक, सर्कुलर रोड, धाड नाका असे वळण घेत संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली अशा विविध मार्गाने काढत रॅलीचा समारोप जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आला.