Breaking…आता सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतच!; निर्बंध अधिक कडक! जिल्हाधिकाऱ्यांचा नवे आदेश

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संचारबंदी, लॉकडाऊन व कर्फ्यू लावूनही जनता जनार्दन व कोरोना दोन्ही जुमानेसे झाले! दुकाने बंद, व्यापारी हवालदिल अन् पब्लिक रस्त्यांवर असे चित्र रोजचेच झाल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आज, 19 एप्रिलला पेट्रोलपंपासह दुकानांची वेळ कमी केली. येत्या 1 मेपर्यंत ही नवीन वेळ लागू राहणार आहे.जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज संध्याकाळी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः संचारबंदी, लॉकडाऊन व कर्फ्यू लावूनही जनता जनार्दन व कोरोना दोन्ही जुमानेसे झाले! दुकाने बंद, व्यापारी हवालदिल अन्‌ पब्लिक रस्त्यांवर असे चित्र रोजचेच झाल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आज, 19 एप्रिलला पेट्रोलपंपासह दुकानांची वेळ कमी केली. येत्या 1 मेपर्यंत ही नवीन वेळ लागू राहणार आहे.
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज संध्याकाळी यांसदर्भातील आदेश जारी केले. यानुसार शहर व गावातील पेट्रोलपम्प, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील पंप 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली दुकाने, आस्थापना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान सुरू राहतील. कृषी केंद्रे व कृषी संबंधित दुकाने सुद्धा सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता अशा मर्यादित वेळेत सुरू राहणार आहेत. एवढेच नव्हे तर आरोग्य, पोलीस, पाणी पुरवठा, पालिका आदी कार्यालये वगळता इतर कार्यालये, विमा कार्यलय, एटीएम, बँक यांची वेळ देखील सकाळी 10 ते दुपारी 2 अशी करण्यात आली आहे.