BREAKING किरीट सोमय्या अचानक बुलढाण्यात! सोमय्यांच्या निशाण्यावर कोण?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी खासदार तथा भाजपचे नेते किरीट सोमय्या आज एकाएकी बुलढाणा धडकले आहेत. सोमय्या यांचा स्वभाव पाहता आज त्यांच्या निशाण्यावर कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे...
 एकेकाळी भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे किरीट सोमय्या गेल्या वर्षभरापासून फारसे माध्यमांमध्ये झळकत नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात सोमय्या यांचा मोठा पुढाकार होता. काही प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी गत काळात ते बुलढाण्यात देखील आलेले होते. दरम्यान आता पुन्हा आज सोमय्या बुलढाण्यात धडकले आहेत. शासकीय विश्रामगृहावर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी सोमय्या यांचे स्वागत केले. प्राप्त माहितीनुसार सोमय्या यांच्या निशाणावर सध्या बांग्लादेशी घुसखोर आणि मतदार आहेत. त्या विषयासंदर्भातच ते आज जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत, त्यानंतर दुपारी ते पत्रकारांशी संवाद देखील साधणार आहेत.