BREAKING भयंकर ! जानेफळ रोडवर वाहनाने अज्ञात महिलेला चिरडले? ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन.. 

 
मेहकर (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आज १७ जुलै रोजी मेहकर तालुक्यातील वरवंड येथे सिद्धांत आश्रमनजीक (जानेफळ रोडवरील) सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास एक भयंकर घटना उघडकीस आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह दिसून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, महिलेचे अंदाजी वय ३५ - ते ४० दरम्यानचे आहे. आज पहाटे कुणीतरी अज्ञात वाहनाने धडक दिली असावी. या दुर्घटनेत, महिलेच्या डोक्यात गंभीर मार लागला. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. महिलेचा मृतदेह बुलढाणा येथील शवगृहात ठेवण्यासाठी जानेफळ पोलीस स्टेशनचे बीट जमादार कैलास चतरकर आणि महिला पोलीस ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या आदेशानुसार रवाना झाले आहे. अध्यापतरी महिलेची ओळख पटली नसून, ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.