BREAKING..! मेहकर फाट्यावरील "त्या" वऱ्हाडाच्या बस पेटण्याचे धक्कादायक कारण समोर..! चालकाला ठरवले जबाबदार...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ४८ वऱ्हाडी घेवून जाणारी खाजगी बस जळून खाक झाल्याचा थरार २५ जुनच्या पहाटे चिखली जवळील मेहकर फाट्यावर घडला. चहा पिण्यासाठी येथे ही बस थांबली. पण शॉर्टसर्किट झाल्याचे दिसून येताच सर्व वऱ्हाडी प्रवाशांचा एकच गदारोळ उठला. सुदैवाने सर्वजण बस खाली उतरले होते, त्यामुळे कुठलीही जिवीत हानी झाली नाही. ही वऱ्हाड मंडळी चंद्रपूर येथून लग्न आटोपून परत बुलढाण्याच्या दिशेने येत होते. पण पोहचण्याचा ४०- ५० मिनिटाआधी हा थरार घडला. काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली होती. दरम्यान, या चित्तथरारक घटनेनंतर एका प्रवाशाने चिखली शहर पोलीस ठाण्यात २६ जून रोजी बस चालका विरोधात तक्रार दिली. यावरून बस चालक विलास पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
     बस मध्ये आपात्कालीन परिस्थितीसाठी खबरदारी म्हणून काहीही काळजी घेण्यात आली नाही. त्याच स्थितीत गाडी चालवल्याने प्रवाशांच्या जीवाशी धोका निर्माण झाला. जळाल्याचा वास येत असल्याने सर्व प्रवासी खाली उतरले होते. दरम्यान आधी लागलेली आग विझवण्यासाठी बस मध्ये फायर एक्स्ट्रींग्यूशर देखील नव्हते. बस चालकाने कुठलीही खबरदारी पाळली नाही. त्यामुळे आग लागण्यासाठी बस चालकच कारणीभूत आहे. असे तक्रारीत म्हटले आहे. बुलढाण्यातील रहिवासी संजय राठोड यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी एम एच ०४ जीपी. ८००८ क्रमांकाची बस चालविणारा बसचालक विलास काशिनाथ पवार रा. येळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.