चिखलीत उद्या रक्तदानाचा महायज्ञ! डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी अनोखे अभिवादन; माजी आ.डॉ.
शशिकांत खेडेकरांनी केले रक्तदान करण्याचे आवाहन..

 
 चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) :चिखलीत उद्या रक्तदानाचा महायज्ञ होणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री तथा शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी या नात्याने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी देखील रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि डॉ. भाऊसाहेबांना आदरांजली अर्पित करावी असे आवाहन केले आहे..श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात हा रक्तदानाचा महायज्ञ संपन्न होणार आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने उद्या २५ डिसेंबर चिखली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा माजी विध्यार्थी या नात्याने सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी देखील रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवुन डॉ.पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेबांना ) आदरांजली अर्पित करावी असे आवाहन खेडेकर यांनी केले आहे