मोठी बातमी बुलढाण्यातून! "शिवाजी कोण होता?"पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी मोर्चाला हजेरी लावणार! आमदार गायकवाड म्हणाले, तर कानाखाली वाजवू;

 मी सगळ्यांना पुरून उरतो... धमकीनंतर ॲडिशनल एस.पी आ. गायकवाड यांच्या भेटीला..
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण राज्याचे लक्ष आज बुलढाणा शहराकडे लागून आहे. "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या प्रकाशकाला आ .गायकवाक यांनी शिव्या दिल्याचा कॉल व्हायरल झाल्यानंतर वातावरण तापले आहे. आ. गायकवाड यांनी शिव्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तरी पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल त्यांचा आक्षेप कायम आहे. दरम्यान आज पुरोगामी चवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बुलढाण्यात आ. गायकवाड यांच्या विरोधात मोर्चा आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे, रोहित पवार या मोर्चा मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा कॅन्सल झाला. मात्र असे असले तरी मोर्चा होणार आहे. आमदार गायकवाड यांनी ज्यांना शिव्या दिल्या ते प्रकाशक प्रशांत आंबी हेदेखील आज बुलढाण्यात येत आहेत. आ. गायकवाड यांच्या घरासमोर "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाचे जाहीर वाचन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान आत्ता या सगळ्या घटनाक्रमावर आ. संजय गायकवाड यांची ताजी प्रतिक्रिया समोर आली असून या प्रतिक्रियेमुळे पोलिसांसमोर पुन्हा मोठे संकट उभे राहिले आहे. पुस्तकाचे त्यांनी जरूर वाचन करावे, आम्ही देखील ते ऐकायला जाऊ मात्र छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला तर मात्र कानाखाली वाजवू असा इशारा आ.गायकवाड यांनी दिला आहे.
 पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारली. आम्ही देखील आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाचा कार्यक्रम ठेवला होता, आमच्या कार्यक्रमाला देखील परवानगी नाकारली आहे. आम्ही कार्यक्रम रद्द केला मात्र ते मुजोरपणे त्यांचा मोर्चा करत आहेत. करा हरकत नाही.. छत्रपती शिवरायांच्या पुस्तकाचे वाचन करा, आम्ही देखील ते ऐकायला येऊ.. आम्ही देखील छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊ..मात्र जर त्यांनी एकेरी उल्लेख केला तर मात्र आम्ही सोडणार नाही, कुणी छत्रपती शिवरायांचा उल्लेख एकेरी केला तर त्याच्या कानाखाली वाजवू असा इशारा आमदार गायकवाड यांनी दिला आहे. यावेळी पत्रकारांनी आमदार गायकवाड त्यांना त्यांच्यावर विजय वडेट्टीवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टिके बद्दल विचारणा केली असता मी "त्यांना उरून पुरतो" असे आ.गायकवाड यांनी म्हटले.
  अप्पर पोलीस अधीक्षक आमदारांच्या भेटीला..
दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह पाच ते सहा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि बऱ्याच पोलीस निरीक्षकांना बुलढाण्यात बोलावण्यात आले आहे. थोड्या वेळापूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आ. गायकवाड यांच्याशी चर्चा करण्यासाठी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत.