BIG NEWS देवेंद्र फडणवीसांनी केंद्रांत जावं अन् एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं! आमदार संजय गायकवाड म्हणाले, "ही" माझ्यासह अनेक आमदारांची इच्छा.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या वक्तव्यांनी सातत्याने मिडियात चर्चेचा विषय ठरणारे आ.संजय गायकवाड पुन्हा एका विधानाने चर्चेत आले आहे. राज्याच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जातील अशी चर्चा विविध स्तरांवर होत असतांना बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार संजय गायकवाड यांनीही त्यात उडी घेतली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची भावना आहे.. पण तेवढे संख्याबळ नाही.मात्र देवेंद्र फडणवीसांनी केंद्रांत जावं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी अशी माझ्यासह अनेक आमदारांची इच्छा असल्याचे आ.गायकवाड म्हणाले.. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना आमदार संजय गायकवाड यांनी हे विधान केले.

 राज्याच्या राजकारणात संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याविषयी सातत्याने बोलत आहेत. याच पार्श्वभूमीवर आ. संजय गायकवाडांना देखील विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही तमाम महाराष्ट्राची इच्छा असल्याचे म्हटले. देवेंद्रजींनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी ही माझ्यासह अनेक आमदारांची इच्छा आहे.

 मात्र याबद्दलचा निर्णय आमच्या हातात नाही. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत म्हणून आम्हाला तसं वाटणं स्वाभाविक आहे. मी जर भाजपमध्ये असतो तर मला देवेंद्रजींबद्दल देखील असंच वाटलं असतं..पण हा निर्णय महायुतीचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा भाजपची टीम आणि आमचे नेते याबद्दल निर्णय घेतील असे आ.संजय गायकवाड म्हणाले..