BIG NEWS अरेच्चा! आमदार सिद्धार्थ खरातांचा व्हिडिओ व्हायरल! अडचणी वाढणार! मॅटर पोलिसांपर्यंत जाणार? 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वेळप्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची देखील शक्यता आहे. 
 
  संजय रायमुलकर यांचा पराभव करीत आमदार झालेल्या सिद्धार्थ खरात यांची जिल्हाभर चर्चा झाली. प्रशासकीय सेवेतून निवृत्ती घेत खरात यांनी निवडणुकीत दंड थोपटले आणि त्यात त्यांना यशही आले. अधिवेशनात त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणातून सगळ्यांचे लक्ष वेधले. मात्र शांत आणि संयमी अशी ओळख निर्माण केलेल्या खरात यांच्या हातात एका सार्वजनिक कार्यक्रमात कुणीतरी तलवार दिली.. मग काय खरात यांनीही नाचता नाचता प्रचंड जोशात तलवार गरागरा फिरवली. यावेळी त्यांच्यासोबत किशोर गारोळे देखील नाचत असल्याचे दिसत आहे..
हाच व्हिडिओ आता व्हायरल होत असून आमदार खरात यांचे हे कृत्य कायद्यानुसार गुन्हा असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. याआधी अनेक राजकीय नेत्यांवर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्यावरही एका कार्यक्रमात तलवार दाखवल्याने गुन्हा दाखल झाला होता. जिल्ह्यात देखील अशा पद्धतीचे याआधी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आर्म ऍक्ट नुसार आमदार खरात यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे...